ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Maharashtra Epstein Files | ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ वगळा

प्रस्तावित चित्रपटाच्या नावाला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर यांचा आक्षेप

पिंपरी-चिंचवड | ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द वगळून चित्रपटाचे नाव बदलावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित विषयाला संपूर्ण राज्याचे नाव जोडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महिलांवरील लैंगिक अत्याचार, शोषण आणि अंधश्रद्धेचे वास्तव चित्रपटातून मांडणे आवश्यक आहे. अशा विषयांवरील समाजप्रबोधनाचे स्वागत केले पाहिजे, असे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे. कलात्मक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर राखताना चित्रपटाच्या शीर्षकात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा आणि जनभावनांचा विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

UAE मध्ये ट्रकच्या धडकेनंतर भीषण अपघात; ३ भारतीयांसह १४ जणांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वारसा, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समतेचे कार्य, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवलेली संविधानिक मूल्ये यांचा संदर्भ भोईर यांनी निवेदनात दिला. या परंपरेतून महाराष्ट्राने देशाला समता, न्याय आणि बंधुतेचा आदर्श दिल्याचे त्यांनी नमूद केले.

भोईर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष आहेत. लोकप्रतिनिधी आणि नाट्यक्षेत्रातील पदाधिकारी या नात्याने त्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटाचा समाजप्रबोधनाचा उद्देश कायम राखून शीर्षकात बदल करण्यासाठी संबंधितांनी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group