Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

विराट कोहलीचा ऐतिहासिक विक्रम; आयपीएलमध्ये ९००० धावांचा टप्पा गाठणारा ठरला पहिला फलंदाज

Virat Kohli | आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात ९००० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आधीपासून अव्वल स्थानी आहे. आता त्याच्या नावे आणखी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ९००० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटने हा कारनामा २७६ व्या सामन्यात आपल्या नावावर केला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला ९००० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही.

हेही वाचा 

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं अन् प्रकृती बिघडली; मुंबईत चौघांचा संशयास्पद मृत्यू

या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने २७६ सामन्यांमध्ये ७१८३ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या शिखर धवनने ६७६९ धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ६५६५ धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानी असलेल्या केएल राहुलच्या नावे ५५८० धावा करण्याची नोंद आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • विराट कोहली – ९००० धावा (२७५ सामने)
  • रोहित शर्मा – ७१८३ धावा (२७६ सामने)
  • शिखर धवन – ६७६९ धावा (२२२ सामने)
  • डेव्हिड वॉर्नर – ६५६५ धावा (१८४ धावा)
  • केएल राहुल – ५५८० धावा (१५३ सामने)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button