ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: प्रभाग क्रमांक २१ मधील उद्यानांची दुरावस्था

राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांचा संताप

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील उद्यानांची अवस्था दिवसेंदिवस खालावत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उद्यानांची कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल न झाल्याने लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी तुटलेली, धोकादायक स्थितीत पडून आहेत.

उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक नसल्याने येथे अमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले, उद्यानात जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. या गंभीर समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही उद्यान विभाग आणि सुरक्षा विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता “ठेकेदार उपलब्ध नाही” किंवा “निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही” अशी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र, ही उत्तरे नागरिकांच्या रोषात अधिक भर घालणारी ठरत आहेत.

हेही वाचा      :                ‘दादां’ना भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी कृतज्ञता मेळावा

दरम्यान, या प्रकरणी आयुक्तांकडून कोणती ठोस कारवाई होते, याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. उद्यानांची दुरवस्था आणि वाढता असुरक्षिततेचा प्रश्न यावर त्वरित उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

महापालिका आयुक्तांकडे तक्रार…

या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक डब्बू आसवानी यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “प्रशासनाकडून अशा प्रकारची टाळाटाळ होत असेल, तर आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “महानगरपालिका उड्डाणपुलांच्या विद्युत रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करू शकते, पण लहान मुलांच्या उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्यासाठी निधी नाही, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे,” असेही त्यांनी म्हटले. आसवानी यांनी आयुक्तांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी करत, “जर प्रशासनाला उद्यानांची देखभाल व सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल, तर ती तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घ्यावा,” अशी ठाम भूमिका मांडली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button