Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त गुरुवारी मोरया गोसावी मंदिरात दिपोत्सव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/default-1464364161-102-how-to-light-a-candle-with-smoke.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उद्या गुरुवारी (दि. 22)सायंकाळी सहा वाजता चिंचवड गावातील मोरया गोसावी समाधी मंदीर येथे भव्य दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम चिंचवड देवस्थान संस्थान आणि संवेदना प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त सुर्यकांत उर्फ नाना थोरात यांच्या वतीने घेण्यात येत आहे. कार्यक्रमात मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज,माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुर्यकांत थोरात यांनी केले आहे.