संकल्प विजयाचा… शुभारंभ प्रचाराचा…: भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या विजयाचा शंखनाद!
मिशन- PCMC : शहरातील ‘हायहोल्टेज’ प्रभागात होणार निवडणूक प्रचाराचा शुभारंभ
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक रणांगणात उतरले आहेत. शहरातील ‘हायहोल्टेज’ प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात काटे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार मोहीमाचा भव्य शुभारंभ होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्र. 28 मध्ये फाईव्ह गार्डन, शिवार गॉर्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लॅक, गोविंद गार्डन यासह अनेक निवासी क्षेत्रांचा समावेश आहे. नगरसेवकपदाच्या कार्यकाळामध्ये या भागातील विकासासाठी केलेल्या काटे यांच्या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
भाजपाने प्रचार मोहीमेच्या शुभारंभासाठी शुक्रवार, 26 डिसेंबर 2025, सायंकाळी 5 वाजता मुंजोबा मंदिर चौक, पिंपळे सौदागर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरातील मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराला ‘मेट्रो सिटी’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प प्रभाग क्रमांक 28 पासून सुरू करायचा आहे. नागरिकांना विकासाच्या वाटेवर साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे आणि शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात हा प्रभाग विकासाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकणार, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
“पिंपळे सौदागर प्रभागाचा प्रत्येक नागरिक विकासाचा भाग होईल, हा माझा निर्धार आहे. आपण एकत्र आल्यास, पिंपरी-चिंचवडला ‘मेट्रो सिटी’चे प्रतिक बनवणे शक्य आहे. नागरिकांची साथ आणि आशिर्वादामुळे हा प्रभाग विकासाचा रोल मॉडेल बनेल.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.






