शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय दिली माहिती?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चार दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवार यांना सौम्य डिहायड्रेशन झाल्याच्या तक्रारीमुळे रविवारी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा – कुक्कू, जुगनू अन् फीलसारख्या आणखी ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी
यापूर्वी त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ५ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पुन्हा रविवारी त्रास झाल्याने त्यांना रुबी हॉल मध्ये आणण्यात आले. मात्र आता उपचारानंतर ते पुण्यातील त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.
शरद पवारांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. त्यांना डिहायड्रेशन इन्फेक्शन झालं होतं. आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नाही. समर्थकांनी चिंता करू नये, रेगुलर रुटीन प्रमाणे त्यांनी गोळ्या घ्यावेत आराम करावा, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.




