‘शाहू सृष्टी’ प्रकल्प अंतिम टप्प्याकडे; अनुराधाताई गोरखे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आधुनिक मांडणीद्वारे वारसा जपणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम

पिंपरी-चिंचवड | राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना आणि समाजसुधारणेच्या कार्याला नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या वेगाने प्रगतिपथावर असून, प्रकल्पाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. KSB चौक येथे साकारला जाणारा हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘शाहू सृष्टी’ हा प्रकल्प केवळ विकासकाम नसून इतिहास, विचार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांचे समाजसुधारणेचे कार्य तसेच सामाजिक समतेचे विचार अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञान, भव्य म्युरल्स आणि जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून येथे उलगडून दाखवले जाणार आहेत.
हेही वाचा : पंतनगरमध्ये विकासाला गती; नागरिकांचा वसंत बोराटे यांना वाढता पाठिंबा
या प्रकल्पासाठी अनुराधाताई गोरखे यांनी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. नियोजनबद्ध कामकाज, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि वेळोवेळी घेतलेल्या आढाव्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून उर्वरित कामही वेगाने सुरू आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ‘शाहू सृष्टी’ हे विद्यार्थी, युवक आणि नागरिकांसाठी एक प्रेरणास्थान ठरणार आहे. शिक्षण, सामाजिक समता आणि परिवर्तनाचे विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रकल्पातून साध्य होणार आहे.
इतिहास जपणं म्हणजे केवळ भूतकाळ आठवणीत ठेवणं नाही, तर त्या इतिहासातून नव्या पिढीचं भविष्य घडवणं असतं. ‘शाहू सृष्टी’ हा प्रकल्प राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची शक्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारला जात आहे. आज या प्रकल्पाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण करून हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच ‘शाहू सृष्टी’ नागरिकांसाठी खुले होणार असून, कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेत या प्रकल्पामुळे मोलाची भर पडणार आहे.
– अनुराधा गोफणे, माजी नगरसेविका.





