Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतनगरमध्ये विकासाला गती; नागरिकांचा वसंत बोराटे यांना वाढता पाठिंबा

वसंत बोराटे यांच्या प्रयत्नातून दीर्घकाळ प्रलंबित समस्या मार्गी; नागरिकांनी केले समाधान व्यक्त

पिंपरी | पंतनगरमधील सेक्टर १६ परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्या मार्गी लागत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कामातून तोडगा निघत असल्यामुळे नागरिकांचा वसंत बोराटे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच प्रभागाचा सर्वांगीण व नियोजित विकास शक्य असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

या परिसरातील ड्रेनेजची समस्या अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूपाची होती. पावसाळ्यात पाणी साचणे, दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र वसंत बोराटे यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावली. त्यामुळे परिसरातील स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न सुटून रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न प्रत्यक्ष कामातून सोडविल्यामुळे नागरिकांमध्ये वसंत बोराटे यांच्याविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता समस्या सोडविण्याची कार्यपद्धती असल्याने स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. समस्या सुटल्याचा आनंद व्यक्त करताना अनेक नागरिक भावूक झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

हेही वाचा      :          उपमुख्यमंत्री पवार यांचा ‘वार’; आमदार लांडगे यांचा ‘पलटवार’

ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा झाली असून सेक्टर १६, पंतनगरमध्ये विकासकामांबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आगामी काळातही विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून प्रभागाच्या विकासासाठी वसंत बोराटे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा ठाम विश्वास असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

काम करत आलोय काम करत राहू..

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर आजही पिंपरी चिंचवडचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या शहरात काम करत आले आणि काम करत राहणार आहे. प्रभागातील नागरिकांच्या विश्वासावरच या निवडणुकीमध्ये यश मिळेल असा विश्वास आहे. ​”येणाऱ्या काळात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन वसंत बोराटे यांनी यावेळी दिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button