Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

चाकणमध्ये कंटेनरला भीषण आग; 40 नव्याकोऱ्या बाईक जळून खाक

पुणे : पुण्यातील चाकणमध्ये पेट्रोल पंपाच्याजवळ पहाटेच्या वेळी डिझेल भरण्यासाठी आलेल्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली, यात कंटेनरमधील 40 नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्यात.

तळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडी गावातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर NL-01AE-7346 नंबरचा कंटेनर डिझेल भरण्यासाठी आला होता.

कंटेनर चालकाने डिझेल भरण्यासाठी मालकाला फोन केला असता. मालकाने फोन न उचल्याने कंटेनर पेट्रोल पंपाच्या बाजूला पार्क केला.

हेही वाचा –  नाशिकची जमीन साधुग्रामच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव, राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट

त्यानंतर काही वेळात एका रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने चालकास कंटेनर मधून धूर येत असल्याची माहिती दिलीत्यावर चालकाने कंटेनरचा मागील दरवाजा उघडला असता आगीचे लोळ बाहेर पडले. यात 40 इलेट्रिकल दुचाकी होत्या. त्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

घटनास्थळी तातडीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्यासह अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टाळला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button