हिंदुभूषण क्रीडामहोत्सव-२०२५ अंतर्गत ‘सोसायटी प्रीमियर लीग’
दिघी-बोपखेलमध्ये रंगणार ''टर्फ क्रिकेट'' स्पर्धा

आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हिंदुभूषण क्रीडामहोत्सव – २०२५ अंतर्गत दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक ०४ येथील सोसायटी धारकांसाठी ‘भव्य दिघी-बोपखेल सोसायटी प्रीमियर लीग (टर्फ क्रिकेट स्पर्धा)’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा १६ ते २२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन एके टर्फ, दत्तनगर, दिघी येथे भाजप युवा मोर्चा, भोसरी-चऱ्होली मंडल अध्यक्ष उदय गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हेही वाचा – पंचवटी टेकडीवर महाराष्ट्र पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण

याबाबत गायकवाड म्हणाले या लीगमध्ये दिघी-बोपखेल परिसरातील सर्व सोसायट्यांनी आणि रहिवासी बांधवांनी सहभाग नोंदवावा या उपक्रमाचा उद्देश स्थानिक युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे, सामाजिक एकता मजबूत करणे असा असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी ९७३९३ ९९९७३९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजक उदय गायकवाड यांनी केले आहे.




