Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिवाळीपूर्वीच शहरातील सर्व खड्डे बुजवणार, मनापाच्या अधिकाऱ्याचा दावा

पिंपरी-चिंचवड : शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर लहान-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली असून वाहनचालकांना खड्डे चुकवून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुसरीकडे शहरात फक्त 582 खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. पावसाने आता विश्रांती घेतल्यामुळे त्वरीत खड्डे बुजविण्यात येतील. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश दिल्याचे महापालिकेचे सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यावर्षी जाेरदार पाऊस झाल्याने शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथ गतीने वाहने पुढे सरकत आहेत.

दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पदपथांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉक डळमळीत झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवर चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडलेले दिसून येत आहेत.

हेही वाचा –  ऑक्टोबर हिटला सुरुवात; पुण्यात पुढील काही दिवसांत उन्हाच्या झळा

यंदा पावसाला मे महिन्यातच सुरूवात झाली आहे. त्यामुळे विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरात 12 फुटांपासून 80 फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार 73 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. साडेचार महिन्यात या रस्त्यांवर चार हजार 65 खड्डे आढळले आहेत.

“शहरात पडलेल्या पावसाने विविध भागातील रस्त्यावर साडेचार महिन्यात 4 हजार 65 खड्डे पडले आहेत. त्यापैकी तीन हजार 696 खड्डे बुजविले असून 582 खड्डे बुजविणे बाकी आहे. पावसाने विश्रांती दिल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. तसेच दिवाळीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविले जातील.”

त्यापैंकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने एक हजार 424, बीबीएमने 313, खडीने 1 हजार 203, पेव्हिंग ब्लॉकने 275, सिमेंट काँक्रिटने 481 असे तीन हजार 696 खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण 86.40 टक्के आहे. शहरातील केवळ 582 खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील विविध भागातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group