Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ऑक्टोबर हिटला सुरुवात; पुण्यात पुढील काही दिवसांत उन्हाच्या झळा

पुणे : शक्ती चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून महाराष्ट्रात पाऊस, उकाडा आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे शहरात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

8 ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. कोकणपट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे. 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील, यावेळी दमट हवामान राहणार असून त्यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे. 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी पाऊस पूर्णपणे जाणार आहे. त्यासोबत उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  मिशन स्थानिक निवडणुका! महायुतीचा इलेक्शन प्लॅन तयार; ‘या’ गोष्टांना प्राधान्य असणार

प्रशांत महासागरात ला निनामुळे यंदा थंडी जास्त वाढण्याची शक्यता आहे. अति पाऊस, अति थंडी आणि अति उष्णता राहू शकते. याशिवाय ऑक्टोबर हिटच्या झळा देखील मे महिन्यासारख्या जाणवू शकतात असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण विभागातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागांतील नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button