उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात पुन्हा मोठा वाद
मौलाना तौकीर रजाच्या समर्थकांकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज
मुंबई : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा वाद झाला आहे. ‘I love Muhammad’च्या समर्थनार्थ शुक्रवारी मौलाना तौकीर रजा यांचे समर्थक कलेक्ट्रेटमध्ये गोळा झाले होते. सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचलेले. त्याचवेळी जमावातील कोणीतरी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही उपद्रवींवर लाठीमार केला. जमावाला पांगवलं. सीओ सिटी आशुतोष शिवम यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. या गदारोळत अनेक जण जखमी झाले. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती आहे. मौलाना तौकीर रजा यांनी शुक्रवारी इस्लामिया इंटर कॉलेजमध्ये ‘I love Muhammad’ पोस्टरच्या समर्थनात प्रदर्शनाच आवाहन केलं होतं. बरेली पोलिसांची तयारी पाहून मौलानाने प्रदर्शन टाळलं. राष्ट्रपतींच्या नावाने अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याच सांगितलं.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
याआधी मौलाना तौकीर रजाच्या एका प्रदर्शनात मोठा वाद झाला होता. त्यामुळे पोलीस, प्रशासन सर्तक होतं. आजच प्रदर्शन लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. 6000 पोलीस जवान तैनात होते. सकाळीच बरेलीच्या गल्लो-गल्ली पोलीस दिसत होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहून मौलाना तौकीर रजाने इस्लामिया इंटर कॉलेजमध्ये होणारं आपलं प्रदर्शन रद्द केलं. म्हणाला की, आता फक्त राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देणार.
मुस्लिम समुदायाला अपील करतो की, त्यांनी शांतता बाळगावी
त्यासाठी त्याने एक लेटरही जारी केलं. यात म्हटलेलं की, “शहरात सुरु असलेली दुर्गा पूजा, दसऱ्याच्या उत्सवासह उर्स-ए-सकलैनी आणि उर्स-ए-शाहदाना सुरु आहे. आम्ही मुस्लिम समुदायाला अपील करतो की, त्यांनी शांतता बाळगावी.हा कार्यक्रम रद्द झाला आहे. आम्ही फक्त राष्ट्रपतींच्या नावे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन सोपवू”
लाठीचार्जमध्ये अनेक लोक जखमी
आज दुपारी जेव्हा मौलाना तौकीर रजाचे समर्थक पोलीस, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निवदेन देण्यासाठी आले, त्यावेळी गर्दीतील कोणीतरी पोलिसांवर दगड फेकले. दगडफेक होताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या पोलीस स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लाठीचार्जमध्ये अनेक लोक जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. घटनास्थळी मोठे पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





