घरकुलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०५ वी जयंती जल्लोषात साजरी

पिंपरी | जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे आयोजन घरकुल परिसरात अतिशय थाटामाटात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या भव्यदिव्य कार्यक्रमात ‘गौरव माझा महाराष्ट्राचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरकुल स्थापनेपासून पहिल्यांदाच यावर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या पुढाकाराने ही जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला घरकुलमधील समाजबांधव आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निमित्ताने घरकुलमधील सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणां व तरुणींचा सन्मान अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे पुस्तक देऊन करण्यात आला. यामुळे तरुण वर्गाने अण्णाभाऊंच्या आदर्शांचा लाभ घेण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोहळ्याला आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, सौ. कीर्ती मारुती जाधव, अरुणा भोसले, अरुण पाडुळे, पोपट हजारे, अजय पाताडे, गोरख पाटील, अजय साने, उस्तव कमिटी प्रमुख बाबासाहेब रसाळ, रोहिणी रोकडे, संदीप रोकडे, कविता कांबळे, मधुरा कांबळे, धनंजय भिसे, संदीपान झोंबाडे, भारती कांबळे, पल्लवी निकाळजे, दीपाली लोखंडे, ज्योती जाधव, दीक्षा जाधव, संतोष जाधव, निखिल आरणे, आकाश आढागळे, आकाश चव्हाण, दत्तात्रेय धर्मे, अभी भोसले, कुणाल पळसकर, यशवंत कन्हेरे, विश्वास सोहनी, शिवानंद चौगुले, अशोक मगर, दशरथ शिंदे, नागेश गवळी, बाबू भाऊ पाटोळे, अविनाश शिंदे, स्वरा डोंगरे, नाथा शिंदे, भगवान वैरागर, तसेच प्रतिष्ठानचे सुरेश वैरागर, राहुल मोरे, महेंद्र कुमार गायकवाड, शांताराम खुडे, संजय एडके, पोपट आरणे, अभिजीत भोसले, लालचंद अडागळे, सुखदेव कापसे, विष्णू निकाळजे, गुलाब वैरागर, कृष्णा खिलारे, विलास गडसिंग, श्रीकांत आवळे, दीपक मोतेवाड, प्रसाद महापुरे, संदीप दीक्षित, सुशांत भिंगारदिवे, अभिजीत वैरागर, रोहित मोरे, धनंजय जाधव, अक्षय वैरागर आदी सर्वजण उपस्थित होते. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाला हातभार लावला.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची आठवण करून देणाऱ्या या कार्यक्रमाने घरकुल परिसरात सांस्कृतिक जागृती निर्माण झाली. भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





