Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे विधानसभा उपसभापतींचे पालिकेच्या पायऱ्यांवर ठाण

डीपी प्लॅन विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा,मोर्चाचे निवेदन राष्ट्रवादी आता मुख्यमंत्र्यांना देणार

आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी.

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच शहरासाठी सुधारित प्रारुप विकास आराखडा सादर केला आहे. या आराखड्या विरोधात तब्बल पन्नास हजार हरकती नागरिकांनी घेतल्या आहेत. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमतता आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महापालिकेवर महामोर्चा काढण्यात आला. या विरोधातील निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त शेखर सिंह पालिका प्रशासकीय इमारतीत उपस्थित नसल्यामुळे विधानसभा व सभापतींना पालिकेच्या पायऱ्यांवर बसावे लागले. दरम्यान शिष्टमंडळ आयुक्तांना निवेदन देणारा आहेत हे माहीत असताना सुद्धा आयुक्त जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. त्यांच्या या वागणुकीबद्दल थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. आणि डीपी प्लॅन विरोधातील निवेदन आता मुख्यमंत्र्यांकडेच देणार असल्याचे विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यातील जनविरोधी आरक्षणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शगुन चौक, पिंपरी येथून सुरू झालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गक्रमण करत महापालिका मुख्यालयावर धडकला.

या आंदोलनात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यालयात गेले. पण, आयुक्त हे विभागीय आयुक्तांची बैठक असल्याचे कारण देवून निघून गेले होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त देखील तिथे उपस्थितीत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निवेदन न देता प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा –  “आपुलकीच्या भेटीने ज्येष्ठ भारावले”!

यावेळी उपसभापती आण्णा बनसोडे म्हणाले की, महानगरपालिकेत आम्ही निवेदन देण्यास आलोय, तर आयुक्त थांबले नाहीत, हे चुकीचं आहे. पण त्यांना माहित नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला आहे. शहराचा नव्याने विकास आराखडा तयार करण्याचं काम, गेली दोन महिन्यापासून सुरू आहे. त्या विकास आराखड्यामध्ये चुकीची आरक्षणे टाकलेले आहेत. 50 हजार हरकती आल्या होत्या. त्या सर्वांचा रोष धरूनच आज जन आक्रोश मोर्चा आयोजित केला.

आज या ठिकाणी पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रमुख नगरसेवक अध्यक्ष सर्वजण आले होते, आमच्या सर्वांचा आयुक्त शेखर सिंह यांनी अपमान केला आहे. त्यामुळे आजचे हे निवेदन त्यांना न देता हेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या स्वाधीन करणार आहे. आज या ठिकाणी जितके शिष्टमंडळ उपस्थित आहे. हेच शिष्टमंडळ उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांनी निवेदन देतील, असेही बनसोडे यांनी सांगितले.

शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, सध्याचा डीपी प्लॅन चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. त्यात बेकायदेशीर आरक्षणे असून, विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत. भीमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पोलीस स्टेशन व बस टर्मिनससाठी ठेवलेले आरक्षण तत्काळ मागे घ्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. त्यांनी संपूर्ण डीपी व टीपी आराखडा रद्द करून नव्याने, जनतेशी सल्लामसलत करून आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

राज्य निवडणूक आयोग, सफाई आयोगाचे पदाधिकारी पुण्यात उपस्थित होते. या संदर्भातील प्रश्नसंदर्भात बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते. त्या बैठकीला मी गेलो होतो. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची बैठक महापालिकेत होती. त्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.

– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button