Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावमध्ये प्रारुप डीपीमुळे विकासाच्या नावाखाली विध्वंस!

नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप: 23 वर्षांपूर्वी बांधलेल्या शाळेवर डीपी रोडचे आरक्षण

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने थेरगावसह शहरातील अनेक भागांमध्ये अघोरी व बिनधास्तपणे विकास आराखडा रेटून लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विशेषतः थेरगाव परिसरात जवळजवळ 70% भाग बाधित करणाऱ्या या आराखड्यामुळे रहिवाशांचे अस्तित्वच संकटात आले आहे.

प्रशासनाने आखलेल्या या कथित विकास आराखड्यात 9 मीटर, 12 मीटर, 15 मीटर आणि तब्बल 24 मीटर रस्ते थेट 100% वस्तीच्या मधून टाकण्यात आले आहेत. या बिनधास्त नियोजनामुळे अनेक घरं, दुकाने, समाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांचा अस्तित्वच धोक्यात आला आहे. थेरगावमधील नागरिक, पालक, विद्यार्थी आणि समाजिक कार्यकर्ते या अन्यायकारक आराखड्याविरोधात एकवटले असून, थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघ या माध्यमातून संघटित संघर्षाची सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेच्या या मनमानी विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला थेरगावकरांचा प्रचंड पाठिंबा लाभला. मोर्चामध्ये मिलेनियम एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विजय पवारयांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा       :        भाजपातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘विजयोत्सव’

या विरोध मोर्चात थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाचे कार्याध्यक्ष विजय पवार, अध्यक्ष अक्षय कांबळे, उपाध्यक्ष दीपक तरडे, सचिव नरेंद्र माने, खजिनदार प्रताप डुंबरे, सहसचिव आकाश पाटील, सहखजिनदार गणेश डोंगरे यांच्यासह कुणाल पवार, आकाश बारणे, संतोष पोकळे, हरीश पाठक, संजय ठाकरे, यशवंत माने, विजय माने, रुपेश गोरे, नाथाजी खंडागळे, निखिल साखळी, सूरज भंडारी, नंदाताई काकडे, मनीषाताई सुतार, माधुरीताई हिवाळे आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळा उद्ध्वस्त होणार का?

मिलेनियम एज्युकेशन संस्थेने थेरगावमध्ये 2002 पासून अल्प फीमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण देणारी शाळा उभी केली — न्यू इंग्लिश मिडियम स्कूल — जी आज 1 हजार 200 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे, ती शाळा प्रशासनाच्या नव्या आराखड्यात 24 मीटर रोडमध्ये येते, हे अत्यंत धक्कादायक आहे. शहरात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचं उज्ज्वल उदाहरण ठरलेली ही शाळा उद्ध्वस्त होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाने डोळस आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन न ठेवता, संपूर्णपणे जमीन मालक, रहिवासी, समाजिक संस्था, शाळा, मंदिरे, स्मशानभूमी यांना न विचारता आणि कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता हा आराखडा तयार केल्याने लोकांमध्ये आक्रोश आहे. थेरगावकरांचा इशारा स्पष्ट आहे ‘‘ हा आराखडा रद्द करा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाला सामोरे जा!’’.

“जिथं घरटी उभी आहेत, तिथं महामार्ग आखणं हे विकास नव्हे – हा अन्याय आहे. मी 23 वर्षांपासून थेरगावमध्ये शिक्षणाचा दिवा तेवत आहे – पण प्रशासनाचा आराखडा तो विझवण्याचा कट आहे. गोरगरिबांची, मध्यमवर्गीयांची शिक्षणसंस्था तुम्ही 24 मीटर रस्त्याखाली टाकणार? हा विकास नाही, हे सामाजिक अंधत्व आहे. ‘‘

– विजय पवार, अध्यक्ष, मिलेनियम एज्युकेशन संस्था.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group