भाजपातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘विजयोत्सव’
विधायक उपक्रम: 1.45 लाख राख्यांचे लष्कराला पाठवणार!

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड भाजप शहर कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यंदाचा स्वातंत्र्यदिन ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानिमित्त लष्कराच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
श्री. काटे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. दहशतवाद्यांविरोधात भारताने घेतलेली निर्णायक भूमिका देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा करणे हे प्रत्येक देशभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे.”
महत्त्वाचे उपक्रम:
रक्षाबंधन विशेष उपक्रम:
पिंपरी-चिंचवड शहरातून १,४५,००० राख्या भारतीय जवानांसाठी पाठवण्यात येणार आहेत. हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि बंधुत्व वाढवण्यासाठी राबवला जाणार आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील डीपी रद्द मोर्चा आणि स्थानिक नेतृत्वाच्या कार्यशैलीवर कष्टकरी जनता आघाडीची टीका
‘हर घर तिरंगा’ अभियान:
प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाईल. लहान मुलांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
इतर उपक्रम:
तिरंगा यात्रा – प्रत्येक मंडल स्तरावर तिरंगा यात्रेचे आयोजन
स्वातंत्र्य सैनिक स्मारक स्वच्छता अभियान – शहरभरातील स्मारकांची स्वच्छता
विभाजन विभीषिका दिवस (१४ ऑगस्ट) – अखंड भारताच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम
या बैठकीत भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले.






