Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर कांग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ नव्हे तर ‘सनातनी दहशतवाद’ असं म्हणायला हवं अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर चव्हाण यांच्याविरोधात आंदोलनं चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं अशी टिप्पणी आव्हाड यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, की सनातन धर्मामुळे भारताचं वाटोळं झालं. सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म कधी अस्तित्वातच नव्हता. आपण हिंदू धर्माचे अनुयायी आहोत. मी या सनातन धर्माविषयी नेहमीच बोलत आलेलो आहे. या धर्माशी संबंधित लोकांनी जे काही लिहून ठेवलंय, जे काही देशात पसरवलंय त्यामुळेच आपल्या देशात वर्णव्यवस्था वाढली, धर्मद्वेष वाढला, उच्च व नीच या राजकारणाचा खेळ सनातन धर्मामुळेच सुरू झाला.

हेही वाचा    :      ‘हिंदी भाषेला मराठी भाषेच्या आधी ओळख मिळाली’; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य 

तथाकथित सनानत धर्माने, त्यांच्या लोकांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. याच सनातन धर्माने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. सनातन धर्माच्या अनुयायांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकलं, त्यांच्या अंगावर घाण फेकली. हाच सनातन धर्म शाहू महाराजांच्या जीवावर उठला होता. याच सनातन धर्माने व त्यांच्या अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाणी पिण्यास, शाळेत जाण्यास मनाई केली होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सनातन धर्माने देशाचं वाटोळं केलेलं असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याविरोधात बंड पुकारलं, त्यांनी मनुस्मृती जाळली, तसेच त्या काळातील अन्यायकारी परंपरा नाकारल्या. मनुस्मृती लिहिणारा व्यक्ती देखील याच सनातनी परंपेरतून जन्माला आला होता. सनातन धर्म आणि सनातनी विचारसरणी ही विकृत आहे, ही गोष्ट सांगताना आपण घाबरू नये, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button