Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरात असतानाच घराला बॉम्बने उडवण्याची धमकी, मोठी खळबळ, एकाला अटक

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आलीये. यामुळे मोठी खळबळ उडाली. गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढण्यात आलीये. पोलिस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर खळबळ उडाली. मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी 8:46 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन आला आणि थेट गडकरी यांच घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याचे म्हटले.

या धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. धमकीच्या फोननंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक बारीक गोष्टीवर पोलिसांची नजर आहे.

या धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. धमकीच्या फोननंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक बारीक गोष्टीवर पोलिसांची नजर आहे.

हेही वाचा –  “…म्हणून मंत्री बोर्डीकरांनी अधिकाऱ्याला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली”, VIDEO शेअर करत रोहित पवारांची टीका

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये असतानाच असा धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. नितीन गडकरी हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आहेत. गडकरींच्या घराबाहेर छावणीचे स्वरूप प्राप्त झालंय. पोलिस दलातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील गडकरींच्या घराकडे धाव घेतली. आजुबाजूच्या परिसराचा तपास कसून केला जात आहे.

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याच्या धमकीनंतर आता पोलिसांनी एकाला ताब्यात देखील घेतलंय. त्याच्याकडून आता कसून चाैकशी केली जात आहे. नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडवण्याचा धमकीचा फोन आल्यानंतर मोठी धावपळ तपास यंत्रणांची सुरू झाली, कारण गडकरी हे त्याच बंगल्यात होते. आता या बॉम्बने उडवण्याच्या धमकी प्रकरणी काय खुलासे होतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, काहीवेळ नागपूरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

उमेश राऊत अस कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मेडिकल परिसरातील देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो.  आपल्या एका मित्रासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत भाड्याने राहतो. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सेक्युरिटीला याची माहिती दिली आणि बिडीडीएस पथकाच्या त्यांच्या दोन्ही घरी पोहचले. मात्र, दोन्ही ठिकाणी काहीच मिळून आलं नाही. पोलिसांनी आता त्याची चौकशी सुरू केली असून त्याने असा धमकीचा कॉल का केला याचा शोध घेत आहे. आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढे आलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button