Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

“…म्हणून मंत्री बोर्डीकरांनी अधिकाऱ्याला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली”, VIDEO शेअर करत रोहित पवारांची टीका

Rohit Pawar : परभणी येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यमंत्री बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की “एका कार्यक्रमाला घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे.” परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील बोरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. “कृपया या नेत्यांना आवरा, महाराष्ट्र बेआब्रू होतोय”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्री व आमदारांना वादग्रस्त वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा –    ‘स्वदेशीचा संकल्प करा’; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणाऱ्यांमध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्यांची. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?”

आमदार पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे.कृपया यांना आवरा..!”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button