ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

म्हाताऱ्या बैलाची कथा, एकनाथ खडसेंची व्यथा !

खेडेगावात घरोघरी दिसणारी एक गोष्ट आहे. जोपर्यंत घरातील दावणीला असणारा बैल औत ओढत असतो, तोपर्यंत त्याची प्रचंड काळजी घेतली जाते. इतकी की, दररोजची पेंड, चारा, आंबील, सणासुदीला कणकीचा गोळा, गुळ..त्याची जबरदस्त चैन असते ! पण, एकदा का तो बैल म्हातारा झाला, औत ओढायचा थांबला, जागेवर बसला म्हणजे थोडक्यात, बिन कामाचा झाला, की मग त्याचे हाल कुत्रे सुद्धा खात नाही ! त्याला हिरवा चारा तर सोडाच, पण वेळेवर पाणी मिळायची मारामार ! आजच्या राजकारणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ती अवस्था झाली आहे, म्हणून या म्हाताऱ्या बैलाची गोष्ट आठवली..!

खडसे यांच्या जावयाचे उपद्रव्याप..

एकेकाळचे भाजपाचे ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री पदाचे दावेदार, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सध्या फार बिकट अवस्था आहे. त्यांच्या शब्दालाच काय, त्यांनाच कोठे मान मिळेनासा झाला आहे. त्यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती, प्रांजल खेवलकर पुण्यातल्या रेव्ह पार्टीत पोलिसांना रंगेहाथ सापडले, हे खडसे यांचे दुर्दैव! केवळ जळगाव जिल्हा सोडून इतरत्र खेवलकर, खडसे आडनावा भोवती पिंगा धरून लोकांनी उगीचच बदनामीचे त्यांच्या नावाचे ढोलताशे जोरजोरात बडवायला सुरुवात केली. त्यात मीडिया आघाडीवर होती आणि आहे !

नवल इतरांना, खडसेंच्या जिल्ह्यात नाही!

नवल इतरांना वाटले, मुक्ताईनगर तसेच जळगाव जिल्ह्यात मात्र एकालाही खडसे, खेवलकर यांच्या या दुष्कृत्याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही, विशेष म्हणजे जावई व्यसनी, व्यभिचारी निघाल्याने त्यानंतर एकनाथ खडसे कमालीचे अस्वस्थ दिसत आहेत, रोहिणी खडसे देखील तोंड लपवत फिरत आहेत, हाही लोकांनी त्याचप्रमाणे, मीडियाने करवून घेतलेला मोठा गैरसमज आहे.

‘राजा भिकारी माझी टोपी चोरली..’

एका गोष्टीमध्ये उंदीर राजाच्या नावाने ओरडत असतो. ‘राजा भिकारी..’ म्हणून ओरडत असतो. आपली ताकद काय, आपली किंमत किती, आपण बोलतो काय याचे भान उंदराला नसते, आणि सगळे राज्य टाळ्या वाजवत असते. नेमके खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांचे, एकनाथ आणि रोहिणी यांना प्रांजलच्या या वागण्याचे किंचितही दुःख नाही, आश्चर्य अजिबात वाटलेले नाही, कारण खेवलकर आणि खडसे कुटुंबियांचे गावातले मुक्ताईनगरचे गेले अनेक वर्षे अतिशय नाजूक संबंध, अवघ्या गावाला माहीत आहेत. गेल्या ४० वर्षातल्या या दोन्ही घरातल्या आपापसातल्या गमती जमती गावकरीच अधिक रंगवून सांगतील. त्यामुळे प्रांजल नेमका कसा किंवा दिवंगत निखिल आणि प्रांजल या दोघांच्या वृत्ती आणि व्यसनांमधले साम्य, नेमके कुठे आणि कोणते.. हेही गावकरी किंवा जिल्ह्यातले खडसे कुटुंबाला जवळून ओळखणारे सारेच सांगतील, यात नवल वाटून देऊ नका !

हेही वाचा –  ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

दुःखाचे, चिंतेचे कारण वेगळेच..

एकनाथजी आणि रोहिणी अस्वस्थ नेमके यासाठी झाले, की यापुढे खरकटे आणि उघडे-नागडेपण हे इतरांना पुराव्यांसहित दिसल्याने यापुढे कसे काय बुवा, त्या गिरीश महाजन यांना ओढूनताणून स्त्रीलंपट ठरवायचे ? त्यावर त्या दोघांचाही चेहरा न दाखवता येणाऱ्या रोगासारखा, त्रस्त झालेल्या पेशंटसारखा दिसू लागला आहे! २६ जुलै नेमकी राज्यासाठी घातवाराची तारीख असावी. हाही प्रकार त्याच तारखेला घडला. पण, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा पळून गेलेल्या दोघी-तिघीत नेमकी रोहिणी की यामिनी होती..की नव्या नात्यातली एखादी होती, त्यावर पोलीस का मूग गिळून आहेत, हे समजत नाही. त्यांनी त्यावर होकार किंवा नकार कळवावा, म्हणजे मनाचे समाधान होईल. आमदार मंगेश चव्हाण यांचा व्हीडिओ बघा, त्यात त्यांनी अगदी स्पष्ट आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहेत.

समोरच्याकडे एक बोट, स्वतःकडे उरलेली..

खडसे कुटुंबातली एखादीच व्यक्ती सोडल्यास, इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला निघालेल्या खडसेंचे महाजनांकडे एक बोट, पण स्वतःकडे उरलेली बोटे आहेत. खडसे यांचे गुरु बाळासाहेब चौधरी यांनी त्यांना एकेकाळी राजकारणात पुढे आणण्यासाठी फार मोठी ताकद दिलेली होती. बाळासाहेब गेले, पण त्यांचे चिरंजीव माजी आमदार शिरीष चौधरी त्यावर कितीतरी किस्से आणि पुरावे जगाला देत आहेत. रोहिणी आणि एकनाथजी यांनी चोपड्याच्या बोरोले कुटुंबावर एकाचवेळी सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आणली होती. अर्थात्, मंदाकिनी म्हणजे एकनाथजींच्या पत्नी सोडल्यास अख्ख्या खडसेंच्या वादग्रस्त कुटुंबावर एखादा केवळ वयस्कांसाठीचा सिनेमा काढता येईल, हा भाग वेगळा!

दिवटा, व्यसनी, स्त्रीलंपट जावई!

खडसेंच्या या दिवट्या, व्यसनी आणि स्त्रीलंपट जावयाने आणि खडसे कुटुंबीयांनी ज्यापद्धतीने आपल्याच लेवा समाजाला मानसिक त्रास दिलेला आहे, त्या खडसे यांनी वास्तविक स्वतःचे कर्तृत्व बरबटलेले असताना इतरांवर व्यभिचाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. त्यांनाच ते राजकीयदृष्ट्या फायद्याचे ठरले असते. पण, आता त्यांनी स्वतःच उरली सुरली लाजलज्जा गमावली असल्याने, यापुढे एकनाथ खडसे यांचे राजकीय पुनर्वसन शंभर टक्के होणे नाही. कदाचित, कुंपणावर बसलेल्या राष्ट्रवादीच्या वादग्रस्त जयंत पाटलांची रोहिणी यांना साथ आणि दाद मिळाली, तर त्या मात्र राज्याच्या राजकारणात पुढल्या शालिनीताई म्हणून राजकारण गाजवून सोडतील, असे समजायला हरकत नाही. पण, जयंत पाटील यांचा भरोसा काय? उद्या भलतीकडे वळला, तर पुन्हा एकदा नव्या नेत्याच्या शोधात रोहिणी यांना उंबरठे झिजवावे लागतील. पण, तडकाफडकी महिलांचे प्रदेशाध्यक्षपद पटकावणाऱ्या रोहिणी यांना जयंत पाटलांचा वरदहस्त होता, म्हणून ते घडून आले, कायम त्यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे ‘कॅसिनो’ मध्ये जाऊन पैसे जिंकण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे !

एकनाथजींचे उर्मट, उद्धट बोलणे

अगदीच सुरुवातीपासून आधी जळगाव जिल्ह्यात, त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांची नकारात्मक भूमिका, उद्धट आणि उर्मट वागणे, बोलणे आणि पैशांच्या मागेच सतत धावणे.. त्यातून सुरुवातीला त्यांना पैसा आणि सत्ता मिळाली. पण, शापही मिळत गेले, ज्यातून खडसे कुटुंब आजच्या तारखेला सर्वार्थाने रस्त्यावर आले आहे. एक पैसा सोडल्यास, जिल्ह्यात आणि राज्यात जो विरोधात जाईल, त्याच्यावर तुटून पडायचे, त्याला संपूर्ण उद्ध्वस्त करायचे, हे यांचे धंदे! पण, जिल्ह्यात त्यांना शेवटी गिरीश महाजन आणि राज्यात देवेंद्र फडणवीस पुरून उरले, आणि येथेच त्यांचे सारे संपले.. होती नव्हती तेवढी हाता पायातील ताकद गेली! अर्थात्, त्यानंतरही जर खडसे शांत भूमिका घेत सकारात्मक पद्धतीने राजकारण खेळले असते, तर फडणवीसांचे मन कर्णासारखे दानशूर आहे, त्यांनी पुन्हा एकवार इतर प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे खडसेंना जवळ घेत राजकीय जीवनदान दिले असते..

सून शहाणी निघाली, म्हणून..

नेमकी हीच भूमिका त्यांच्या सुनेने घेतली, रक्षा खडसे आज केंद्रात मंत्री आहेत. पण, रोहिणी आणि एकनाथजी बदलायला तयार नाहीत. शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हातारा बैल दावणीवर बसला आहे आणि त्याचा करंटा जावईसुद्धा त्याला आणखी खड्ड्यात घालत आहे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button