ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

मानसिक समतोल राखण्यासाठी योग अत्यंत प्रभावी उपाय

पिंपरी- चिंचवड : गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांच्या मन:शांतीवर परिणाम होत असून, त्यांच्यात मानसिक समतोल राखण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच शाळेत दररोज योगासनं व सूर्यनमस्कार नियमितपणे घेतले जातात.

कार्यक्रमाची सुरुवात १६ जूनपासून झाली असून, २० जूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी **योगा पूर्वस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम फेरी २१ जून रोजी घेण्यात आली. या योग सप्ताहात विद्यार्थ्यांना योगाविषयी मार्गदर्शन करण्याचे कार्य शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. रवींद्र कलवई, श्री. समाधान माने व सौ. अश्विनी कागले यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.

हेही वाचा –  कुदळवाडीतील नागरिकांनी घेतला योग साधनेचा अनुभव

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. यावेळी शाळेतील संस्कृत शिक्षक आणि योग अभ्यासक आचार्य दीपक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी महर्षी पतंजलींच्या अष्टांग योग व स्वामी स्वात्माराम यांच्या हठयोग प्रकारांची माहिती दिली. ते म्हणाले की, “योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन असून, तो केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा विषय नसून, दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा.”

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही प्राणायाम व विविध योगासनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शालेय परिसरात विविध आसनांची माहिती देणारी जनजागृतीपर भित्तीचित्रे लावण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक ज्ञान मिळाले.

कार्यक्रमास संस्था अध्यक्ष आ. श्री. विनायकराव पंढरीनाथ भोंगाळे साहेब, संस्था सचिव आ. श्री. संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका आ. सौ. कविताताई कडू पाटील, विश्वस्त आ. सौ. सरिताताई विखे पाटील, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक , शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. योग दिनाचा उपक्रम हा शाळेतील आरोग्यदायी आणि सकारात्मक उपक्रमांतील एक महत्त्वाचा भाग ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button