Milk Price Hike : कात्रज डेअरीकडून दूध दरात दोन रुपयांची वाढ
संघाचे स्वप्नील ढमढेरे यांची माहिती : पुणेकरांच्या खिशाला प्रति लिटरप्रमाणे दोन रुपयांची झळ

कात्रज : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी)ने दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या वाहतुक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने संघाने आज (ता. १६) च्या मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले.
हेही वाचा – वारकऱ्यांना टोलमाफी, शासनाकडून निर्णय जारी

यापूर्वी, डेअरीने मे महिन्यात फुल क्रीम दूध आणि प्रमाणित दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. यावेळी मात्र, टोण्ड दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात टोण्ड दूधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली नव्हती, असे डेअरी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता वाढ केल्याने पुणेकरांच्या खिशाला प्रति लिटरप्रमाणे दोन रुपयांची झळ बसणार आहे.





