EVM बद्दल सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस, दिले ‘हे’ नवे निर्देश
![Supreme Court notice to Election Commission on EVM](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Supreme-Court-notice-to-Election-Commission-on-EVM-780x470.jpg)
EVM | महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून संशय व्यक्त केला जात असल्याने EVM संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमधील कोणताही डाटा डीलिट करू नका तसंच ईव्हीएममध्ये कोणताही डाटा ॲड करू नका, असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून १५ दिवसात उत्तर देण्यास सांगितलं आहे. यावेळी मतदान संपल्यानंतरही ईव्हीएम डेटा सुरक्षित ठेवला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणं म्हटलं आहे. त्याचा डाटा हटवू नये. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे कशी ठेवली जातात याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्याचेही निर्देश दिले आहे.
हेही वाचा : मंत्री उदय सामंत यांची जेएनयू मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट!
या याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निवडणूक आयोगाला ईव्हीएममधून कोणताही डेटा हटवू नये किंवा मतदान यंत्रांमधून कोणताही डेटा रीलोड करू नये, असं सांगितलं आहे. निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर जाणून घेण्याच्या प्रक्रियेबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून माहिती मागितली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा