Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदतवाढ नाही; पणन विभागाचे स्पष्टीकरण
![No new extension from the central government for the purchase of soybeans; Marketing Department clarifies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/No-new-extension-from-the-central-government-for-the-purchase-of-soybeans-Marketing-Department-clarifies-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.
काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि, ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’