‘२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही’; भाजप नेत्याचं विधान
मुंबई | दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवलं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पक्षाने जागा मिळवल्या आहेत. भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. यावरून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
चंद्रशेखऱ बावनकुळे म्हणाले, की काँग्रेस पक्षाकडे कोणतंही मॉडेल नाही. कोणतीही निती नाही. काँग्रेसकडे कोणतीही नितिमत्ता नाही. जनता काँग्रेसला मते का देतील? त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही. २०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा : सरकार अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? सरकारनं दिलं स्पष्टीकरण
२०४७ पर्यंत या देशात काँग्रेस निवडणूक जिंकू शकत नाही. कारण २०४७ पर्यंत विकासाचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पावर राष्ट्र पुढे चालणार आहे. जनता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संकल्पांना साथ देईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.