ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे?

आकाच्या आकाची पिलावळ आहे, त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे....

बीड : भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख निर्घृण हत्येचे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणात आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय आता करुणा मुंडे यांनी देखील राजीनामाची मागणी केली आहे असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. आता आकाच्या पिलावळीचा त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्या बऱ्या, त्या बोलणं योग्य होणार नाही, त्यामुळे तपास स्पॉइल होईल असेही भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

परभणीवरुन मुंबईला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी पोलिसांवर कठोर कारवाई आणि कुटुंबियांना आवश्यक असलेली नुकसान भरपाई देण्याची मागणीसाठी निघालेला मोर्चा रद्द करण्यात आला आहे. नाशिक येथे हा मोर्चा आला त्यास परभणीच्या पालक मंत्री अपर्णा बोर्डीकर यांनी सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मोर्चा रद्द करण्याची विनंती केली. या प्रकरणात आपण पहिल्या दिवसांपासून आंदोलकांच्या संपर्कात आहोत. पायी चालणे अत्यंत क्लेशकारक आहे. या प्रकरणात ५ पोलीसांना निलंबित केले आहे. आंदोलकांची १२ पोलीस निलंबित करण्याची मागणी होती. परंतू पोलिसांचं मॉरेल डाऊन होऊ नये म्हणून असे केले नाही. प्रशासनाला दोन्ही बाजूने पाहावं लागतं. यासाठी कारवाई नाही केली. त्यांच्या इतर मागण्यांची पूतर्ता एक महिन्यात व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचा कानावर सर्व घातलंय असे यावेळी सुरेश धस यांनी सांगितले. त्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असेही ते म्हणाले.

हेही वाचा  :  ‘अजिंक्य डी वाय पाटील’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच केली ग्राम स्वच्छता! 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
संतोष देशमुख प्रकरणात आकाच्या आकाच्या राजीनाम्याची आमची मागणी कायम आहे. आता करुणा मुंडे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे, हे त्यांनाच विचारावं लागेल. आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देतो. ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्यासोबत नाही. आता परळीतील ५०० व्यापारी आणि लोकांनी गाव सोडलं आहे. तिथं अनेक माफिया, राख माफिया, वाळू माफिया आहेत. आकाच्या आकाची पिलावळ आहे, त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय त्या बोलणं योग्य होणार नाही,अन्यथा तपास स्पॉईल होईल, यासाठी आपण धनंजय देशमुखला समजावणार आहोत. कृष्णा आंधळे हा परराज्यात असणार. ते कोकरू आहे, कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलीस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे असेही सुरेश धस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button