आयुर्वेदमध्ये सूर्यादयानंतर आणि सूर्यास्तपूर्व जेवण करणे कधीही चांगले
लवकर जेवण केल्यामुळे लठ्ठपणा कमी
![Ayurveda, Suryadaya, Sunset, Food, To do, good,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/ahara-780x470.jpg)
मुंबई : नास्ता सकाळी उठल्यानंतर दोन तासांत केले पाहिजे. दुपारचे जेवण 1 ते 2 वाजे दरम्यान केले पाहिजे. संध्याकाळचे जेवण 7 वाजेपूर्वी केले पाहिजे. कधी उशीर झाला तर 8 पर्यंत संध्याकाळचे जेवण करत येईल. नास्ता सकाळी उठल्यानंतर दोन तासांत केले पाहिजे. दुपारचे जेवण 1 ते 2 वाजे दरम्यान केले पाहिजे. संध्याकाळचे जेवण 7 वाजेपूर्वी केले पाहिजे. कधी उशीर झाला तर 8 पर्यंत संध्याकाळचे जेवण करत येईल.
वजन कमी होणार- तुम्ही लवकर जेवण केल्यावर शरीर त्या जेवणाचा चांगला वापर करतो. त्यामुळे शरीरात मेटाबोलिज्म निर्मितीचा वेग वाढतो. जेवण सहज पचते आणि शरीराला नवीन उर्जा मिळते. लवकर जेवल्यामुले कॅलरी बर्न होते, त्यामुळे वजन कमी होते. पचन चांगले होणार- जेव्हा तुम्ही झोपणे आणि जेवणा दरम्यान विशिष्ट गॅप ठेवतात, तेव्हा जेवण सहज पचते. परंतु रात्री उशिरा जेवल्यामुळे जेवण पचत नाही. त्यामुळे पोट दुखी, गॅस, पोटावर सूज येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
हेही वाचा – पीएम स्वनिधीसाठी होणार सर्वेक्षण !
मधूमेहसाठी फायदेशीर – मधूमेह म्हणजे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर जेवण करणे आवश्यक असते. मधूमेहाच्या रुग्णांनी लवकर जेवण केल्यावर शरीरात ग्लूकोज बनवण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. उशिरा जेवण करणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगले नाही.
झोपेत सुधारणा होणार- पचनक्रिया जेवणानंतर सुरु होते. परंतु तुम्ही जेव्हा उशिरा खातात आणि झोपतात, तेव्हा पचनक्रिया सुरळीत होत नाही. त्यामुळे झोपेत अडथळे येतात. वेळेवर जेवण केल्यामुळे पचन चांगले होते आणि झोप चांगली लागते. हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा – बऱ्याच वेळा, उशीरा खाल्ल्याने अन्न पचणे कठीण होते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. या परिस्थितीत पोटात गॅस ॲसिडिटी होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. म्हणूनच डॉक्टर नेहमी वेळेवर खाण्याचा सल्ला देतात.