‘इंद्रायणीनगर भागातील पीएमपीएल बस सेवा सक्षम करा’; शिवराज लांडगे यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-16-1-780x470.jpg)
पिंपरी : इंद्रायणीनगर परिसर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. अनेक कोचिंग क्लास, आस्थापना, सरकारी कार्यालय देखील वाढत आहेत. या भागामध्ये चांगले आरोग्य सेवा असल्यामुळे आणि रुग्णांची देखील ये जा या भागात असते त्यामुळे या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे असल्याची मागणी भाजपचे युवा नेते शिवराज लांडगे यांनी केली आहे.
भाजप नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली युवानेते शिवराज लांडगे यांनी याबाबतचे निवेदन पुणे परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांना दिले आहे. तातडीने याबाबत कार्यवाही व्हावी अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहे.
हेही वाचा – ‘शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजावेत यासाठी साहित्य संमेलने’; उद्योग मंत्री उदय सामंत
दिलेल्या निवेदनामध्ये शिवराज लांडगे यांनी म्हटले आहे की, आळंदी ते निगडी ही बस आळंदी जय गणेश साम्राज्य घरकुल निगडी या मार्गे आहे. परंतु संतनगर चौक, स्पाईन रोड, स्पाईन मॉल, सेक्टर १२ येथील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी अडचणीचे होत आहे. तसेच चिखली ते मनपा हि बस सुद्धा सेक्टर १३ टेल्को रोड सेक्टर १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना खंडेवस्ती-गवळीमाथा ते मनपा या मार्गाने सुरु करण्यात यावी अशी मागणी आहे.
या ठिकाणी कामाकरिता व शिक्षणाकरिता अनेक जण बसने प्रवास करतात. परंतु सध्या या ठिकाणी बस नसल्याने या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. वास्तविक या ठिकाणी प्रवासी, विद्यार्थी, कामकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. ह्या सर्वाचा विचार केला तर या मार्गे बस सेवा असणे हे अत्यंत गरजेचे आहे. तरी, या मार्गावरील बस सेवा सुरु करणेबाबत स्थानिकांची मागणी असुन एक लोकहिताची बाब म्हणून बस सेवा सुरु करण्यात यावी, असे शिवराज लांडगे यांनी पत्रात म्हटले आहे.