पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत ‘‘हॅट्रिक’’
शिक्षण विश्व : बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद
![PCP students win hat-trick in chess and carrom tournament](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/PCP-students-win-hat-trick-in-chess-and-carrom-tournament-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड | इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवून हॅट्रिक केली.
कॅरम स्पर्धेत पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पीसीपीच्या संघाने या स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद पटकावून हॅट्रिक साध्य केली. मुलींच्या संघाने कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
सौ. वेणुताई पॉलिटेक्निक, पुणे येथे झालेल्या मुलांच्या कॅरम स्पर्धेत विजेत्या संघांना प्राचार्या डॉ. एम. एस. जाधव , समन्वयक डी – १ झोनल हेडकॉटर वाय. एल. निंबाळकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक मुलांच्या स्पर्धेमध्ये जी. पी. अवसरी संघाने मिळवला.
हेही वाचा : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमधील क्रीडा स्पर्धांना जिल्ह्यातून प्रतिसाद
अजिंक्य डी. वाय. पाटील लोहगाव, पुणे येथे झालेल्या मुलींच्या बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेत विजेत्या व उपविजेता संघांना प्राचार्या डॉ. एफ. बी. सय्यद, पॉलीटेक्निक कॉर्डिनेटर एन. एल. शेळके व स्पोर्ट्स कॉर्डिनेटर अतुल हिवळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मुलींच्या स्पर्धेमध्ये जी. पी. अवसरी संघाने मिळवला. तर चेस स्पर्धेत पहिला क्रमांक वाडिया कॉलेज पुणे यांनी मिळवला.
यशस्वी विद्यार्थी व संघ व्यवस्थापक प्रा. संपत ननवरे, राजू गायकवाड, मारुती गायकवाड, प्रा. कोमल वाणी, प्रा. रेशमी ओव्हाळ, क्रीडा समन्वयक सुनील जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे, प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.