सूर्यनमस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता; कविता कडू पाटील
शिक्षण विश्व: सूर्यनमस्कार महोत्सवात गायत्री इंग्लिश मिडीयम शाळेचा उत्स्फूर्त सहभाग
![Kavita Kadu Patil said that Suryanamaskar improves concentration among students.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Kavita-Kadu-Patil-said-that-Suryanamaskar-improves-concentration-among-students.-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड | सूर्यनमस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता जागरूक होण्यास मदत होते. धकाधकीचे जीवन, अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सूर्यनमस्कार शास्त्रशुद्ध पर्याय असल्याचे गायत्री इंग्रजी माध्यम शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील म्हणाल्या.
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार महोत्सव २०२४-२५ मध्ये सहभाग नोंदविला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशाकिरण सोशल फाऊंडेशन, थेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने (दि 4) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर येथे सूर्यनमस्कार जनजागृती अंतर्गत “जागतिक सूर्यनमस्कार दिन २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेचा तब्बल ₹ 74,427.41 हजार कोटींचा अर्थसंकल्प!
यावेळी कविता कडू पाटील म्हणाल्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याची मनःशांती हरवत चालली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांवर जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ही मनशांती स्थिर करण्याकरिता योगा व सूर्यनमस्कार महत्वाचा आहे. अशा प्रकारच्या विधायक कार्यक्रमाकरीता जास्तीत जास्त पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी व मनपा शाळेतील विद्यार्थी एकत्र आले यातून ताणविरहित जीवनशैलीचा एक नवा अध्याय सुरू होत असल्याचेही कडू पाटील म्हणाल्या.
या कार्यक्रमाकरिता गायत्री शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांचे प्रोत्साहन लाभले. संस्थेचे सचिव संजय भोंगाळे, विश्वस्त सरिताताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी , सर्व मुख्याध्यापक-उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनी मुलांचे व क्रिडा शिक्षकांचे विशेष कौतुक केले.यासाठी क्रीडा शिक्षक अश्विनी कागळे , रवींद्र कालवाई यांनी मार्गदर्शन केले.