मध्य रेल्वे मार्गावरी लोकल सेवा विस्कळीत
डोंबिवली, दिवा, मुंब्रा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल 10 ते 12 मिनिट उशिराने
मुंबई : मुंबईत लोकल सेवेला जीवन वाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मुंबई धावत असते. प्रत्येक कामाची एक ठरलेली वेळ असते. त्यात थोडा जरी बदल झाला, तरी संपूर्ण दिवसाच वेळापत्रक कोलमडतं. त्यात लोकलचा टायमिंग एक महत्त्वाचा भाग आहे. ठरलेल्या वेळची ट्रेन चुकली, तर नंतरची काम बिघडतात. त्यात सिंग्नल यंत्रणेतील बिघाड, ओव्हर हेड वायर तुटणं यामुळे लोकलला काही मिनिटं उशिर होणं याची आता मुंबईकरांना सवय झाली आहे. आज सकाळी डोंबिवली, दिवा, मुंब्रा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल 10 ते 12 मिनिट उशिराने धावत आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व धीम्या लोकल उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळ्च्यावेळी हा बिघाड झाला असला, तरी पुढचे काही तास लोकल सेवेवर याचा परिणाम होणार आहे. कारण मुंबईत काही मिनिटांच्या अंतराने लोकल धावतात. त्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. मध्य रेल्वेचा कर्जत-कसारापर्यंत विस्तार झाला आहे. दररोज सकाळी चार वाजल्यापासून ट्रेनला गर्दी असते. पहाटेपासून लोकांच्या लोकलच्या वेळा ठरलेल्या असतात. कसाराच नाही, तर पुण्याहून नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत. काही कारणांमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली, तर त्या सर्वांना याचा फटका बसतो.
हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे?
प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतो
सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी किंवा नोकरीवरुन सुटण्याच्यावेळी लोकल सेवा विस्कळीत झाली, तर प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. नोकरीवर पोहोचण्याच्यावेळी उशिर झाला तर लेट मार्क लागतो आणि संध्याकाळी घरी जाण्याच्यावेळी बिघाड झाला तर प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतो. मध्य रेल्वे मार्गावर लोकलला काही मिनिटं उशिर हे आता प्रवाशांच्या सुद्धा अंगवळणी पडलं आहे. मुंबईत मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज लोकलच्या हजारो फेऱ्यात होतात. लाखो लोक या ट्रेनमधून प्रवास करतात. पश्चिम रेल्वे मार्गाचा अगदी डाहणू-पालघर पर्यंत विस्तार झाला आहे.