१० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
Budget 2025 | थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये नोकरदार सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
केंद्रातील मोदी सरकार २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात दहा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेऊ शकते. यावेळी अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होऊ शकते. याशिवाय १५ लाख ते २० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नासाठी २५% नवीन कर स्लॅब लागू करण्याचीही सरकारची योजना आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे एका रूग्णाचा मृत्यू
तसेच यावेळी सरकार करमुक्त उत्पन्न वाढवू शकते असे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, सरकार या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्र, GDP वाढ, महागाई, कर स्लॅब इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकते तसेच, देशातील विकासाला गती देण्यासाठी अनेक धोरणे बदलता येतील.