Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC | पथनाट्यातून ओला-सुका कचरा विलगीकरणाचा संदेश!

पथनाट्यातून जनजागृती; महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त

पिंपरी-चिंचवड | दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे स्वच्छतेचे महत्व आणि महात्मा गांधी यांचे विचार  पथनाट्यातून जनजागृती म्हणून सादर करण्यात आले. ओला सुका हा कचरा, विलगीकरणं करू या! पिंपरी चिंचवडला नंबर वन करू या असे सांगत नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

पथनाट्यामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, संगीता जोगदंड, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे आणि महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत डॉ. पी. एस. आगरवाल यांनी सहभाग घेतला होता. यानिमित्ताने सफाई कामगारांचा सत्कार देखील करण्यात आला.

हेही वाचा  :  स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महापालिकेच्या कचरा संकलन गाडीसमोर हे पथनाट्य सादर करण्यात आले. ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून वेगवेगळ्या डब्यातून भरलेला असावा आणि रोज सकाळी येणाऱ्या महापालिकेच्या गाडीत वेगवेगळ्या कप्प्यात तो टाकला जावा. स्वच्छ्तेत ईश्वर दडलेला असतो. असे प्रबोधन या पथनाट्यातून करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन पवार, ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, आरोग्य निरीक्षक स्नेहल कांबळे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, मुरलीधर दळवी, डॉ. पी.एस.अगरवाल, सुभाष चव्हाण ,शामराव सरकाळे, प्रकाश घोरपडे, प्रकाश बंडेवार, मुकादम विनोद कांबळे, दीपा गराडे, सुमन कारखानीस, सा.का.प्रदीप गायकवाड, गुणवंत कामगार शंकर नाणेकर,काळूराम लांडगे, ज्ञानराज वाडेकर, जयश्री गुमास्ते, श्रीकृष्ण फिरके, बेसिक्स टीमचे समाधान कांबळे, सागर पाटील, शुभम बेंद्रे, झोनल इन्चार्ज सुखदेव लोखंडे, वार्ड इन्चार्ज विजय पेंडे उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button