PCMC | अतिक्रमण कारवाईला विरोध; चिखली-कुदळवाडीतील व्यापारी रस्त्यावर!
रास्ता रोको, वाहतूक कोंडी अन् तणावाचे वातावरण
![Opposition to encroachment action; On the commercial road in Chikhli-Kudalwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Opposition-to-encroachment-action-On-the-commercial-road-in-Chikhli-Kudalwadi-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकानांवर गुरुवारी (दि.३०) कारवाईला सुरवात केली. मात्र, या कारवाईला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध करत देहू-आळंदी रस्ता अडवल्याने रस्त्यांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोठी गोदामे, वारंवार उद्भवणाऱ्या आगीच्या घटना यामुळे चिखली, कुदळवाडी परिसर संवेदनशील झाला आहे. या भागातील अनधिकृत बांधकामे दुकाने कळीचा मुद्दा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना रडारवर आहेत. या आस्थापनांमुळे वायू व ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील अनधिकृत दुकाने बांधकामे हटवण्यात यावी या मागणीने जोर धरला होता.
हेही वाचा : ‘खंडणी मागाल तर मकोका लावणार’; अजित पवारांचा कडक शब्दात इशारा
महापालिकेने या संदर्भात कारवाई करत उद्योजक व्यापारी यांना अनधिकृत बांधकामा बाबत नोटीस बजावल्या. गुरुवारी या संदर्भात कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईला विरोध करत उद्योजक, व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत.