पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी चाकणच्या विद्यार्थ्यांनी लिहिली गडकरी काकांना १००० पत्रे….
परिसरातील गैरसोयींबद्दल व येणाऱ्या अडचणी यासंदर्भात विद्यालयातून पत्रे पटवली
![Infrastructure, facilities, chakan, students, wrote Gadkari, uncle, 1000 letters,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/chakan-1-780x470.jpg)
चाकण : विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल व विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल चाकणच्या विद्यार्थ्यांनी पुणे नाशिक तसेच तळेगाव दाभाडे तें शिक्रापूर महामार्गावरील पायाभूत सुविधा व समस्येबाबत आपली तक्रार पञे रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालय विभागाचे केंद्रीय मंत्री ना. श्री नितीनजी गडकरी यांना पत्र लिहून परिसरामध्ये होत असलेल्या गैरसोयींबद्दल व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यासंदर्भात विद्यालयातून १००० पत्रे मा नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री यांना पाठवण्यात आली. सदर विषयाची संकल्पना संस्थेची अध्यक्ष शामरावजी देशमुख यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे प्राचार्य श्री .दीपक शिंदे व प्राचार्या सौ.स्वाती रणदिवे यांनी या विषयाला विस्तृत स्वरूप देऊन महामार्गावरील तसेच परिसरात होणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण होण्यासाठी मंत्री महोदयांना पत्र पाठवले.
सदर पत्रामध्ये परिसरात सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, त्याचबरोबर होणारे अपघात, नगरपरिषद हद्दीमधील तसेच महामार्गांवरील अतिक्रमणे ,रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण, रस्ते ओलांडताना होणारे अपघात, सुरक्षितता, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, सांस्कृतिक ठेवा, इ. विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार पत्राच्या माध्यमातून प्रकट केले. त्याचबरोबर विद्यार्थी दशेमध्ये या प्रकारचे अपघात घडल्यावर त्यामधून परिवारातील महत्त्वाचा घटक गमावल्यावर त्या परिवारावर येणारे दुःख दारिद्र्य ,क्लेश व संकटे या विषयालाही हात घालण्यात आला. परिसरामध्ये नेहमीच निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्याकारणाने होणारे अपघात त्याचबरोबर शहरी भागामध्ये स्पीड ब्रेकर, अनधिकृत पणे लावण्यात आलेली वाहने, शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात होणारे ट्रॅफिक जाम ,रस्त्यात असणारे खड्डे, नुकताच झालेला भयानक असा कंटेनर अपघात इ. विषयावर विद्यार्थ्यांनी बोलक्या स्वरूपात आपली मत पत्रांद्वारे व्यक्त केली.
हेही वाचा : ‘आयआयबी’ मध्ये विद्यार्थ्यांचे सलग १५ तास अभ्यास करत ‘‘रेकॉर्ड’’
त्याचबरोबर या पत्रांमधील महत्त्वाचा घटक असा होता की शाळेमध्ये शिक्षण घेत असलेले विविध प्रांतातील इतर भाषिक विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषेमध्ये पत्र लिहिली. त्यामध्ये मराठी, हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, बेंगॉली , उडिया व इंग्रजी भाषेतील पत्रांचा समावेश होता. सदर पत्रे विद्यालयाच्या वतीने पोस्ट ऑफिस मध्ये जमा करण्यात आली. सदर नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातील सर्व समाज बांधवांकडून कौतुक करण्यात आले. असे नावीन्यक्रम उपक्रम राबवणारी चाकण किंवा पुणे जिल्ह्यातील पहिली शाळा आहे असा नामोउल्लेख पोस्ट ऑफिसच्या द्वारे करण्यात आला. त्याचबरोबर अशा प्रकारे अनेक उपक्रम शाळा आपल्या स्तरावर घेत असून समाजामध्ये जनजागृती करण्याचा चांगला उपक्रम घेत असल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व मार्गदर्शक प्राचार्यांचे कौतुक केले.व चाकण नासिक व तळेगाव शिक्रापूर महामार्गाचचे काम गडकरी साहेब तात्काळ मार्गी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.