ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड गुन्हेवृत्त: सायबर फसवणुकीसाठी बँक खाते देणाऱ्या सहाजणांना अटक!

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्‍याची कामगिरी

पिंपरी-चिंचवड : सायबर फसवणुकीसाठी बँक खाते पुरविणार्‍या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्‍या सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली.

शुभम मोहन लोंढे (वय २४, रा. पाटीलनगर, चिखली), सॅम ऊर्फ डेविड ऊर्फ संबीधकुमार श्रीपती नायक (वय २२, रा. राऊलकिला, उडीसा), प्रोफेसर उर्फ हिमांशुकुमार गणेश ठाकुर (वय २४, रा. हजारीबाग, झारखंड), राजअंश सिंग संतोष सिंग (वय २१, रा. संगीता हाईटस, भुगाव. मूळगाव हजारीबाग, झारखंड), गौरव अनिलकुमार शर्मा (वय ४०, रा. बलसाड, गुजरात), अंकुश रामराव मोरे (वय ३१, गंगापुर खेड, नाशिक) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्‍त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्‍यात दाखल असलेल्‍या एका गुन्‍ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार हेमंत खरात यांना माहिती मिळाली की, शुभम लोंढे हा सायबर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे बँक अकाऊंट देण्याचे काम करत आहे. त्‍यानुसार त्‍याला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने हे अकाऊंट सॅम उर्फ डेव्हिड याला दिले आहे. असल्याचे सांगितले. डेव्हिड हा दोन वर्षापासुन देशातील अकाऊंट धारकाशी टेलीग्रामद्वारे संपर्क साधुन त्‍यांचे अकाऊंट कंबोडियातील मुख्य आरोपीस देत असे. सॅम हा २० पेक्षा जास्त मोबाइल नंबर वापरत असल्याचे दिसुन आले. त्‍याला २३ जानेवारी रोजी हिंजवडीतून अटक केली.

हेही वाचा  :  ‘आयआयबी’ मध्ये विद्यार्थ्यांचे सलग १५ तास अभ्यास करत ‘‘रेकॉर्ड’’

आरोपी सॅमकडून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे भुगाव, घोटावडे, भुकुम, बावधन, हिंजवडी मधील हॉटेलवर जावुन पाच खातेदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्‍ह्यातील आरोपी पकडले जावु नयेत म्हणुन ते वॉचर मार्फत बँक किट ताब्यात घेवुन कुरिअरद्वारे आरोपी रहात असलेल्या बावधन येथील फ्लॅटवर पाठवत असे. पोलिसांनी बावधन येथील फ्लॅटवरून आरोपी राजअंश सिंग याला ताब्‍यात घेतले. हा आरोपी बँक किट जमा करुन कंबोडिया येथील मुख्‍या आरोपीला पाठवत असे. आरोपी सॅम याने चौकशीमध्‍ये मागील दोन वर्षापासुन कंबोडिया देशातील आरोपी सोबत हे काम करत असल्‍याचे दिसून आले. बलसाड गुजरात येथुन अकाऊंट पुरविणारा आरोपी गौरव शर्मा आणि अंकुश मोरे याच्‍यासह सहा आरोपीकडून नऊ मोबाइल, एक टॅब, १० चेकबुक हस्‍तगत केले. या आरोपींनी कंबोडियातील मुख आरोपीला हजारो बँक अकाऊंट दिल्याचे दिसून आले.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी उपायुक्‍त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्‍त डॉ. विशाल हिरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button