Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिखली परिसरात दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Amit-Satam-18-780x470.jpg)
चिखली : बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. २६) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गणेशनगर, तळवडे येथे करण्यात आली. सूर्या सुभाष पतरा (वय २२, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा – रुग्णांच्या इन्शुरन्सची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेत हॉस्पिटलची ४५ लाखांची फसवणूक
पोलीस नाईक अमर शिवाजी कांबळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्या पतरा हा गणेशनगर, तळवडे रोड येथील बीकेसी हॉटेलमध्ये अवैध दारू विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून १२ हजार ९५ रुपयांची देशी दारू आणि रोख ९२० रुपये असा एकूण १३ हजार १५ रुपयांचा ऐवज जप्त केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा