जवानांच्या जीवनावर आधारित नाटिकेने उपस्थितांना अश्रू अनावर!
प्रजासत्ताक दिन: संतपीठ शाळेत विविध कार्यक्रम
![A play based on the lives of soldiers moved the audience to tears.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/A-play-based-on-the-lives-of-soldiers-moved-the-audience-to-tears.-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत पिठामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारतीय जवानांच्या जीवनावर आधारित नाटकेने उपस्थित त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळगाव चिखली येथे शाळेच्या प्रांगणामध्ये भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ.स्वाती मुळे, प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याधपिका स्नेहल पगार, समन्वयिका मयूरी मुळूक, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव, चिंतन समिती सदस्य ज्ञानेश्वर तथा माऊली भांगरे, ह.भ.प युवराज शिंदे, विनायक आबा मोरे, अंकुशशेठ मळेकर उपस्थित होते.
हेही वाचा : निगडी प्राधिकरणमधील संत ज्ञानेश्वर चौकात प्रजासत्ताक दिन उत्साहात
ध्वज रोहनानंतर आर. एस.पी. च्या विद्यार्थी संचलन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गाडगे यांनी शाळेने केलेल्या प्रगती व भविष्यातील वाटचालीची माहिती सांगितली.यावेळी मयुरी फडके मराठी तर कार्तिक यादव इंग्लिश, आयुष कुमार हिंदी आणि अवनी रुपनवर हिने संस्कृत भाषेतून भाषण केले, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सबसे उँची विजय पताका हे समूहगीत तर भारतीय जवानांच्या जीवनावर आधारित नाटिकेने प्रेक्षकांचे अश्रु अनावर झाले.
विद्यार्थी संचलनासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक विजय भस्मे व सुधा खोले यांनी तर समूहगीतासाठी नेहा नाफडे, अविनाश भोगील, विवेक भालेराव तर नाटिका व नृत्यासाठी सविता गोडसे, गायत्री बारी, ईशा पटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अभ्यासाबरोबर खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या रितिका पाटील तसेच शाळेची साफसफाई सेवा देणाऱ्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटील व सुवर्ण भोंगाळे तर शाळेच्या समन्वयिका मयुरी मुळूक यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले, वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.