पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
इंटर इंजिनिअरींग बास्केटबॉल स्पर्धा : द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pune-9-2-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन”डी.१”झोन तर्फे मुला व मुलींची बास्केटबॉल स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकमध्ये प्रथमच बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विठ्ठल सोमाजी काळभोर , नरेंद्र ज्ञानेश्वर लांडगे व कॉलेजच्या प्राचार्या डॉ.विद्या बॅकोड यांच्या उपस्थितीत पार पडले. क्रीडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे , लक्ष्मी धरकुडे यांनी आलेल्या सर्व टीम संघ व्यवस्थापकांचे तसेच खेळाडूंचे स्वागत केले.
हेही वाचा – PCMC: दोन महिन्यांत तब्बल 600 कोटी रुपये वसुलीचे आव्हान!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज वाखारे सर तसेच आभार प्रदर्शन श्री शाहूराज कदरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी फिजिकल डायरेक्टर संतोष पाचारणे यांचे मार्गदर्शन लाभले.
वाडिया पॉलिटेक्निक प्रथम क्रमांकाचा मानकरी…
बास्केटबॉल स्पर्धेत वाडिया पॉलिटेक्निक, पुणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुलांच्या स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकने द्वितीय क्रमांक, तर मुलींच्या स्पर्धेमध्ये अजिंक्य डी वाय पाटील लोहगाव यांनी तृतीय क्रमांक मिळवला.