महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागम कार्यक्रमाला सुरुवात
सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे प्रवचन ऐकायला लाखो भाविक दाखल
पिंपरी : सदगुरू सुदीक्षा जी महाराज यांच्या सान्निध्यात महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. यामध्ये “विस्तार – अनंताच्या दिशेने” या विषयावर साधकांना आध्यात्मिक प्रवचन ऐकायला मिळणार आहे.
सुमारे ३०० एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रावर संत निरंकारी मिशनच्या सेवादलांनी या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले आहे.
हेही वाचा : महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
संत निरंकारी मंडळाचे समागम चेअरमन शंभूनाथ तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, कॅन्टीन, पार्किंग, स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा सांभाळण्यासाठी संत निरंकारी सेवादलाचे सुमारे १५ हजार सदस्य समर्पित भावनेने सेवा देतील. संत समागमाच्या तीनही दिवसांमध्ये दुपारी दोन ते रात्री साढे आठ या वेळेत सत्संगाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होईल. यात विविध संत महात्मा आपले विचार मांडतील सत्संगाच्या शेवटी सदगुरु सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांचे प्रवचन होणार आहे.





