Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रसाद सस्ते आणि यशराज अमराळे यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढतीसाठी चाचणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड कुस्ती चाचणी स्पर्धेत गादी विभागातून प्रसाद सस्ते तर माती विभागातून यशराज अमराळे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य अधिवेशन ६७ वे आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत वाडिया पार्क मैदान, अहिल्यानगर येथे दिनांक २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाने वाकड, कावेरी नगर क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या निवड चाचणी स्पर्धेत गादी विभागातून ८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गटात मोशीचे प्रसाद सस्ते आणि आकुर्डीचे तन्मय काळभोर यांच्यात लढत झाली. यामधे सस्ते याने काळभोरवर चितपटीने विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढती साठी प्रवेश निश्चित केला. तर माती विभागातून चऱ्होलीचा यशराज अमराळे आणि भोसरीचा समाधान दगडे यांच्यात चुरशीशी लढत झाली. अमराळे याने अधिक गुण मिळवत विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत मध्ये प्रवेश मिळवला.

हेही वाचा  : शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न; कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

गादी विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :

५७ किलो वजन गट प्रणव सस्ते (मोशी) विजयी विरुद्ध प्रथमेश कडलघ,(सांगवी). ६१ किलो वजन गट अजिंक्य माचुत्रे (चिंचवड) विजयी विरुद्ध प्रतिक धिमधिमे (चिखली). ६५ किलो वजन गट महेश जाधव( भोसरी) विजयी विरुद्ध रुद्र वाळुंजकर(पिंपरी).७० किलो वजन गट जयेश शेलार (रहाटणी) विजयी विरुद्ध अर्जुन कापसे (रहाटणी).७४ किलो वजन गट योगेश्वर तापकीर (चऱ्होली) बिनजोड . ७९ किलो वजन गट परशुराम कॅम्प(आकुर्डी) विजयी विरुद्ध सक्षम गोडांबे(पिंपळे नीलख). ८६ किलो वजन गट सौरव शिंगाडे (किवळे) विजयी विरुद्ध निरंजन बालवडकर (पिंपळे निलख). ९२ किलो वजन गट सौरभ जाधव (दिघी) विजयी विरुद्ध अथर्व तांबे (रहाटणी).
९७ किलो वजन गट शेखर शिंदे (पिंपळे गुरव) विजयी विरुद्ध यश थोरवे (चऱ्होली).८६ ते १२५ महाराष्ट्र केसरी गटः प्रसाद सस्ते (मोशी) विजयी विरुद्ध तन्मय काळभोर (आकुर्डी).

हेही वाचा  :  बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कृती आराखडा राबवा; आमदार अमित साटम

माती विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :

५७ किलो वजन गट ओम तापकीर(चऱ्होली) बिनजोड..६१ किलो वजन गट संकेत माने (आकुर्डी) विजयी विरुद्ध विनायक नाईक(रहाटणी). ६५ किलो वजन गट महेश सलगर (पिंपरी) विजयी विरुद्ध ओमकार नलावडे (एचए तालीम). ७० किलो वजन गट कुणाल कस्पटे (वाकड) विजयी विरुद्ध किशोर भोसले (चऱ्होली). ७४ किलो वजन गट चंद्रभान मदने(मोशी) विजयी विरुद्ध( सिद्धांत दराडे (दिघी). ७९ किलो वजन गट राज बालवडकर (पिंपळे नीलख) विजयी विरुद्ध अनिकेत लांडे (भोसरी). ८६ किलो वजन गट दिग्विजय काळे (भोसरी) विजयी विरुद्ध सिद्धांत लांडे (भोसरी). ९२ किलो वजन गट पृथ्वीराज नढे (काळेवाडी) विजयी विरुद्ध गणेश राठोड (भोसरी).९७ किलो वजन गट कुणाल शेवाळे (भोसरी) विजयी विरुद्ध यश नखाते (रहाटणी).८६ ते १२५ किलोगट महाराष्ट्र केसरी गट: यशराज अमराळे विजयी विरुद्ध समाधान दगडे (भोसरी).

या स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुटे, सचिव संतोष माचुत्रे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संतोष निंबाळकर, दिलीप बालवडकर, भारत केसरी पैलवान विजय गावडे तसेच, काळूराम कवितके, दिपक गावडे, पंडित मोकाशी, बबन बोऱ्हाडे, राजू कुदळे, रतन लांडगे, सदाशिव नेवाळे, दिलीप काळे, राजाभाऊ जाधव, सुरेश वाळुंज, संदिप नेवाळे, विजय पाटुकले, बाबू चिंचवडे, अजय लांडगे, दिगंबर वाघेरे, दिलीप बारणे, राजेश काळभोर,विवेक शेलार, उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पंच म्हणून विजय कुटे, रोहिदास आमले, विक्रम पवळे, बाळासाहेब काळजे, चंद्रकांत मोहोळ, रूपेश जाधव, यांनी काम पाहिले. तर या निवड चाचणी स्पर्धेमध्ये एकूण ११० खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर ९० लढती झाल्या.स्वागत विजय गावडे, सूत्रसंचालन संतोष माचुत्रे तर आभार ज्ञानेश्वर कुटे यांनी मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button