Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कृती आराखडा राबवा; आमदार अमित साटम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीचे निवेदन

नजरकैद केंद्र, प्रमुख शहरांमध्ये विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करा

मुंबई | बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी तातडीने कृती आराखडा राबवण्याची गरज आहे. शहराच्या विविध भागात नजर कैद केंद्र उभारणे, प्रमुख शहरांमध्ये विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवणे व निकालानंतर घुसखोरांना त्वरित देशाबाहेर पाठवणे गरजेचे असल्याचे आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले आहे.

महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या बांगलादेशी घुसखोर तसेच रोहिंग्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठिकठिकाणी अनेक भागात घुसखोर बांगलादेशी बेकायदेशीर रित्या वास्तव्य करून आहेत यामुळे सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमीत भास्कर साटम यांनी मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कृती आराखडा सुचवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले आहे.

हेही वाचा  : शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न; कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

अंधेरी पश्चिमचे आमदार साटम यांनी पश्चिम बंगालमार्फत सीमा ओलांडून मुंबईत बेकायदेशीररीत्या स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे घुसखोर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले आहे, याचा अलीकडचा सैफ खान हल्ला प्रकरण हा एक ठळक दाखला आहे. त्यामुळे प्राधान्याने काही उपाययोजना तातडीने करण्याची गरज असल्याचे साटम यांनी निवेदनात म्हटले आहे.

साटम यांनी म्हटले आहे ,बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांसाठी शहराच्या उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद केंद्र उभारणे. प्रमुख शहरांमध्ये विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवणे व निकालानंतर घुसखोरांना त्वरित देशाबाहेर पाठवणे.पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) अधिनियम, १९५०, आणि परदेशी नागरिक अधिनियम, १९४६, मध्ये सुधारणा करून घुसखोरीसाठी कठोर शिक्षा व दंडाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांमुळे होणारा धोका कमी होण्यासाठी , मुंबई तसेच महाराष्ट्राची सुरक्षितता आणि स्थैर्य वाढवण्यासाठी नजर कैद केंद्र फास्टट्रॅक कोर्ट आणि खटल्यांचा तातडीने निकाल ही त्रिसूत्री वापरून बांगलादेशी घुसखोर तसेच रोहिंग्यांवर अटकाव शक्य आहे.

– अमित साटम, आमदार, अंधेरी पश्चिम, मुंबई.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button