ताज्या घडामोडीपुणे

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची बुद्धी राज्यकर्त्यांना झाल्यास महात्मा फुले यांना आदरांजली ठरेल – शरद पवार

भारतरत्न की महात्मा पदवी मोठी - भुजबळ

चाकण : शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची भावना किंबहुना अशी बुद्धी राज्यकर्त्यांना झाल्यास ती महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले

चाकण येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ होते यावेळी यावेळी खासदार अमोल कोल्हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर आमदार बाबाजी काळे माजी आमदार राम कांडगे प्रकाश गजभिये दिलीप जमदाडे सूर्यकांत पलांडे दिलीप मोहिते बाळासाहेब शिवरकर बबनराव कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करून समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेत. असे पवार आपल्या भाषणात म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात अधिक आधुनिकतेची कास धरून विज्ञानाच्या सहकार्याने शेती करावी असे प्रयत्न त्यांनी केले.

भारतरत्न की महात्मा पदवी मोठी – भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, ‘महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जाते. याबाबत मी अनेक विचारवंतांशी चर्चा केली. भारतरत्न पुरस्कार दिल्यास भारतरत्न महात्मा जोतिराव फुले असा नामोल्लेख करायचा का? महात्मा कमी आहेत. भारतरत्न अनेक आहेत. त्यामुळे जनतेने बहाल केलेली जोतिराव फुले यांची महात्मा ही मोठी पदवी आहे. हे माझे मत आहे. भारतरत्न सन्मानाचा, हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचा मला अवमान करायचा नाही’. महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजात क्रांती घडविली. महात्मा फुले यांचा लढा अंधश्रद्धा, ब्राम्हणयवादा विरोधात होता. शेती, बेरोजगारीवर त्यांनी लिहिले. त्यांच्यावरही अन्याय झाला. डोक्यावरुन पाणी गेल्यावर त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला. मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असताना झाली. फुले-शाहू-आंबेडकर हे आमची दैवते आहेत. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आणि शरद पवार कितीही वेळा एकत्र येऊ शकतो. राजकीय चिंता करू नये, असेही ते म्हणाले.

राजकीय भाष्य टाळले

माझी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ व ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार म्हणून अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र दोघांनी या व्यासपीठावर राजकीय भाष्य टाळले इतकेच नाही तर एकमेकाकडे पाहणे सुद्धा ही टाळले. यावेळी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर दोन ओळीचा संदेश लिहून भुजबळाकडे ती पत्रिका दिल्यानंतर 30 ते 40 सेकंदावरची त्या दोघात चर्चा झाली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button