Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ अपघातात बिबट्याचा मृत्यू
![Leopard dies in accident near Pimpaloli tunnel on Pune-Mumbai Expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/bibtya-780x470.jpg)
पुणे | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा (Leopard Accident) मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास घडली.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ बिबट्याचा अपघात (Leopard Accident) झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे एक वर्ष चार महिने वयाचा बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले.