‘संजय राठोड यांना कायम आपला विरोध राहील’; चित्रा वाघ यांचं वक्तव्य

Chitra Wagh | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) नागपूर येथे पार पडला. या शपथविधी सोहळ्यात ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात पुजा चव्हाण प्रकरणात चर्चेत आलेले संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांना लक्ष्य केले आहे. यावरून चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांना संजय राठोडांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर चित्रा वाघ म्हणाल्या, की मी मागेही आणि आताही म्हणतेय की, मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनीच क्लिनचीट दिली होती. याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यात त्यांनी क्लिनचीट दिली म्हणून त्यांना मंत्री केल्याचं शिंदेंनी सांगितले. तेच आता पुढे चाललं आहे. माझी लढाई तर सुरूच आहे. परंतु ज्यांनी क्लिन चीट दिली आहे. त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे.
हेही वाचा – मंत्रिमंडळातून ‘या’ ११ दिग्गजांचा पत्ता कट; कोणाकोणाला वगळलं?
विधानपरिषदेवर संधी दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, जिच्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास, भुगोल नाही. अशा सर्वसामान्य घरातल्या एक महिलेला सभागृहापर्यंत पोहचवले. त्यामुळे आमचे लाडके देवाभाऊ आणि बावनकुळे साहेबांचे आभार मानते. माझ्यासारख्या हजारो महिलांना नेहमी संधी देण्याचं काम भाजपच्या माध्यमातून होत असतं. त्या माध्यमातून मला मिळालेल्या संधीचं सोनं करेन. ज्या ठिकाणी विशेषता महिला वर्गासाठी मी काम करत आली आहे. त्यांचे मुद्दे प्रकर्षाने सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्या जीवनमानात सुधार आणण्यासाठी प्रयत्न करेन. त्यांच्या चेहऱ्यांवर आंनद आणण्याचाही प्रयत्न करेन. मला विश्वास आहे की आमचे लाडके देवा भाऊ महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतील. त्यांच्यासाठी चांगले काम करतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.





