Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगाव स्टेशन भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन परिसरातील काही भागात गुरुवार (दि.१२ डिसेंबर) व शुक्रवार (दि.१३ डिसेंबर) रोजी पाणी येणार नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

शहरातील स्टेशन विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी व शुक्रवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्टेशन विभागातील यशवंत नगर, तपोधाम कॉलनी, चाकण रोड वरील जनरल हॉस्पिटल ते मधुबन साई सिटी पर्यंतचा परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा –  उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर..’; भाजपा नेत्याचं खुलं आव्हान

सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, अशी सूचना पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभिजीत शिंदे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button