शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते मोफत मतदान स्मार्ट कार्ड वाटप व नवीन मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन

पिंपरी : धाराशिव मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना शाखा मोहननगर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी मोफत मतदान स्मार्ट कार्ड वाटप व नवीन मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुन्हा निवडून आल्याबद्दल शिवसेना शाखेच्या वतीने आमदार कैलास पाटील यांचा श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर नवीन मतदान नोंदणीचे फॉर्म व ज्येष्ठ नागरिकांचे मतदान कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा – विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती
यावेळी माजी नगरसेविका मीनल यादव, शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव, शशिकांत पांडाळे, नागेश नामदे, मधुसूदन आंबुसकर, सोमनाथ अलंकार, मोहन धापटे, रघुभाऊ कदम, काशीद काका, भोसले साहेब, दत्तात्रय धावडे, राजू खजिनदार, निलेश सुबे, संजय वडपल्ली, संजोग महाजन असे अनेक शिवसैनिक व मोहननगर मधील नागरिक यावेळी उपस्थित होते.





