Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्नेहमेळावे, नागरिकांच्या गाठीभेटीवर भर कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांचा लोकसंपर्क

पुणे :  स्नेहमेळाव्यांना उपस्थिती, नाट्यप्रयोगांचा आस्वाद, प्रथितयश नागरिकांच्या गाठीभेटी या माध्यमातून भाजप- महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

कोथरूडमधील प्रभाग क्र. १२ येथील प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन पाटील यांनी मतदानाचे आवाहन केले. सांस्कृतिक कार्यकर्त्या श्रुती महाजन, प्रदीप केरकर, नवचैतन्य हास्य क्लबचे अशोक पुजारी, अभिनेत्री विभावरी देशपांडे, निवृत्त वायुदल अधिकारी मिलिंद पांडे, डॉ. प्रदीप डोंगरे, ॲड. राजेंद्र नांगरे, व्यावसायिक पवन गोसावी, आयडियल सोसायटीचे ट्रस्टी मकरंद केतकर, अमोल शिंदे आदींच्या घरी भेट पाटील यांनी दिल्या.

कोथरूडमधील मायबाप जनतेने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. येत्या निवडणुकीतही त्यांची पसंती विकासालाच असेल, असा विश्वास पाटील यांनी या भेटीत व्यक्त केला. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त श्री शिवाजी स्मारक मंडळ रायगड आणि अग्रेसर भारत व्यासपीठाच्या वतीने वसंत कानेटकरलिखित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित “येथे ओशाळला मृत्यू’ या अजरामर नाट्यकृतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दीपप्रज्वलन करून पाटील यांनी या प्रयोगास शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीरराव थोरात उपस्थित होते.

हेही वाचा     –    ‘गेल्या १५ वर्षांत मतदार संघामध्ये विकास झाला नाही’; डॉ. अर्चना पाटील चाकूरकर 

दरम्यान, चंद्रकांत पाटील य यांनी लाडशाखीय वाणी समाजाच्या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी आयोजित सुरेल मैफलीत सुमधुर गीते श्रवण करण्याचा आनंद पाटील यांनी घेतला. जनता सहकारी बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील य म्हणाले, “या कार्यक्रमात अनेक जुन्या मित्रांची भेटही झाली. पुणे जनता सहकरी बॅंकेशी माझे घट्ट ऋणानुबंध आहेत. आज स्नेहमेळावा कार्यक्रमास उपस्थित राहिलो असता पुन्हा आपल्या परिवाराला भेटतो आहे, अशी भावना निर्माण झाली.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button