आता देशमुखांचे बेणे हटवा, अर्चना ताईंना आमदार करा!
लातूरच्या देशमुखांनी गावच्या गायरान जमीनी हडपल्या

ताईंना आमदार म्हणून विधानसभेत पाठविल्याशिवाय स्वस्थ न बसणार नाही
लातूर | राज्यात शिंदे सरकार सत्तारुढ होण्याआधी बिले भरुनही लाईट बंद होत होती. पण शिंदे सरकार आल्यावर लाईट चालू आणि शेतकऱ्यांची बिले माफ झाली. हे फक्त महायुतीने केले आहे. लातूरच्या देशमुखांनी गावचे गायरानही हडप केल्या आहेत. शेतकरी ऊसाचे बेणे जसे तीन वर्षाला बदलतो, तसे आता देशमुखांचे बेणे हटवा आणि ताईंना आमदार करा. विलासराव देशमुख, डॉ. शिवाजीराव पाटील यांनी शिवराज पाटील यांना पाडले. आता आपण त्यांना पाडू, असे हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पुन्हाळे यांनी म्हटलं.
लातूर शहर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. प्रभू श्रीरामाला १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला होता. डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यामुळे आपल्या सगळ्यांचा वनवास आता संपणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी येत्या २० नोव्हेंबरला कमळाला आपले बहुमुल्य मत देऊन ताईंना निवडून द्या, असे आवाहन पाथरीकर महाराजांनी केले.
हेही वाचा – चंद्रकांतदादा पाटलांसाठी भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला
या निवडणुकीत मतदारांनी दहशत संपवून विकासासाठी परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व लाडक्या बहिनींनीही माझ्यासह आपल्या तिन्ही बंधुंनाही मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन अर्चना पाटील चाकूरकर यांनी केले.
यावेळी पाथरीकर महाराज, व्यंकटराव पन्हाळे, लालासाहेब देशमुख, उपसरपंच संतोष शेळके, बाबू खंदाडे, चंद्रकांत खटके, डॉ. वैभव वाघमारे, अरविंद सुरकुटे, विठ्ठल शेंडगे, सोमनाथ वाघमारे, जनार्दन गुरमे, शंकर वाघमारे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश बोरा, संदीप मामा जाधव, दिपक बडगिरे, चंद्रकांत शिंदे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





